माझे आवडते पुस्तक निबंध – Maze Aavadate Pustak Marathi – माझे मराठीचे पुस्तक

ज्ञान मिळविण्याचा खरा मार्ग म्हणजे शाळा. पण शाळा म्हटली की पुस्तके आठवतात आणि विविध विषयांची अनेक पुस्तके पाहिली की मनाला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण मला आनंद मिळतो, मन गाण्यासाठी, नाचण्यासाठी आतूर होते ते माझे मराठीचे पुस्तक पाहूनच.

माझ्या मराठीच्या पुस्तकाचे नाव मराठी सुलभभारती आहे. नावातच सोपेपणा, सुलभता दिसते. हस्तकलेला चालना देणारे मुखपृष्ठ दिसते. तर ऐतिहासिक कलांसाठी मलपृष्ठ पहावेच. एकूण चौऱ्याहत्तर पृष्ठांचे हे पुस्तक आहे.

पुस्तकात एकूण सहा कविता आणि चौदा धडे आहेत. त्यामध्ये प्रत्येक धडा हा काहीतरी शिकवण देणारा आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या इसाप, राजा आणि लोहार, कावळा चिमणी अशा अनेक गोष्टी आहेत. तर राष्ट्रप्रेम व लोकजागृतीसाठी सावित्रीबाई फुले, लालबहादूर शास्त्री असेही पाठ आहेत.

कवितांमधून मातृभूमीची थोरवी व आईची माया, महत्व रूआईकवितेतून कळते. विज्ञानाची ओढ लागावी म्हणून विमान कविता आढळते.

असे स्पष्ट व सुंदर छपाईने, अनेक चित्रांनी भरलेले माझे आवडते मराठीचे पुस्तक आहे.

माझे आवडते पुस्तक निबंध – Maze Aavadate Pustak Marathi – माझे मराठीचे पुस्तक

पुढे वाचा:

Leave a Reply