प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी – Pravasa Che Mahatva in Marathi
आपण व्यवसाय, मनोरंजन, व इतर अनेक कारणांनी प्रवास करीत असतो. पण शिक्षणाच्या दृष्टीने फारच कमी वेळा प्रवास करतो. खरे पहाता प्रवास हे शिक्षणाचे सर्वात उत्तम साधन आहे. प्रवासामुळे आपल्याला जगाची माहिती होते. अन्य लोकांची भाषा, रहाणीमान, संस्कृती व इतिहास कळतो. आपण जे पहातो आणि अनुभव करतो ते आपल्या मनात रेंगाळत रहाते व त्याचा ठसा कधीही पुसला जात नाही. वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधल्याने व संस्कृती जाणून घेतल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व विचारपद्धती बदलते.
प्रवासामुळे आपण अधिक जागृत होतो. त्यामुळे आपल्याला चांगले व वाईट यात फरक करता येतो. व्यापार व व्यवसाय कसा करावा हे शिकता येते. आपण निसर्गाच्याही अधिक जवळ जातो. आपले व्यक्मित्व सुधारण्यात, संपूर्ण विकास होण्यात मदत मिळते. प्रवास करण्यासाठी मोठी हिम्मत व सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करण्याचे बळ लागते.
प्रवास करतांना लगेच निर्णय घेणे, व्यावहारिक रहाणे व संकटे झेलण्याची सवय गते. अधिक प्रवास करणारी व्यक्ति अधिक माहितगार, लोकप्रिय व बुद्धिमान असते. विद्यार्थ्यांनी तर प्रवासाची प्रत्येक संधी घेतली पाहिजे. प्रवासाचे सर्व फायदे मिळावेत यासाठी डोळे, कान व मत उघडे ठेवून वावरावे. सर्व काही शिकण्याची इच्छा मनात ठेवावी.
म्हणूनच मला असे वाटते की प्रवास हे शिक्षणाचे उत्तम साधन आहे. जुनी म्हणच आहे-‘केल्यान दशाटन, पंडित सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार.’
पुढे वाचा:
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी
- बैल पोळा निबंध मराठी
- पोलीस निबंध मराठी
- पोरक्या मुलीचे मनोगत
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध
- पुस्तकाची कैफियत निबंध मराठी
- पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध
- पिंजऱ्यातील सिंहिणीचे मनोगत
- पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त
- पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी
- पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी
- पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन
- पाणी मराठी निबंध मराठी