प्रगत भारतीय महिला निबंध मराठी

आम्ही आहोत स्वातंत्र्योतर कालखंडातील शैक्षणिक सामाजिक, आर्थिक व घरातून बाहेर सांस्कृतीक क्षेत्रातील स्वतंत्र आणि प्रगत अशा महिला. पूर्वीच्या स्त्रिया साक्षर नव्हत्या त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्रात स्वतंत्र नव्हत्या. याचे मूळ ‘शिक्षणात’ आहे. आजची मुलगी स्वत:च्या पायावर उभी आहे. उच्च विद्याविभूषित असल्याने पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिच्या खाजगी गोष्टीतील निर्णय ती स्वतः घेऊ शकते. पूर्वी पडदा पद्धती असल्याने स्त्रिला पुरुषांपुढे येता येत नसे त्याचबरोबर सती जाणे, बालविवाह, विधवा पुनर्विवाह बंदी, केशवपन यामुळे स्त्रीवर प्रचंड तणाव असे. त्यामुळे तिला स्वतः विषयी निर्णय घेण्याला वावच नसे, व्यक्तिस्वातंत्र्य नसल्याने इतर, विशेषतः पुरुष काय सांगतील त्या गोष्टीला मान्यता दयावी लागे. जात नसल्याने व्यवहारी ज्ञान नसे. शिक्षण नसल्याने भले बुरे याविषयी अज्ञान होते त्याचा फायदा अनेक कर्मठ व सनातनी घेत व तिचा अतोनात छळ होत असे.

ह. ना. आपटे यांच्या ‘पण विचारात कोण घेतो’ ? कादंबरीमध्ये स्वातंत्र्यपुर्व स्त्रीच्या कर्मकहाण्या वाचायला मिळतात व सहजच मनात येते. केवळ शिक्षण माणसाला किती चतूर व व्यवहार कुशल बनविते. यामुळेच आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन प्रगती साधत आहे. असे एकही क्षेत्र नाही की त्यात स्त्रीने प्रगती केली नाही. जमीनीवरील तर सोडाच पण विमानात देखील स्त्रीचे वर्चस्व पहायला मिळते. समुद्रातही दिसते व युद्धक्षेत्रात आणि संशोधन क्षेत्रात देखील, स्त्रीने प्राधान्य मिळविले आहे.

आज सर्वच क्षेत्रात स्त्रीचे वर्चस्व असल्याने तिला पारतंत्र्याची झळही लागत नाही. थोड्याशा त्रासासाठी देखील आज ती कायद्याचे दार ठोठावू शकते व न्याय मिळवू शकते. वैचारिक स्वातंत्र्यामुळे स्वत:च्या भल्याबुऱ्याची जाणीव झाली आहे. पूर्वीच्या स्त्रीला व्यवहारज्ञान नसल्याने आर्थिक व्यवहार देखील कळत नव्हते पण आजची स्त्री लाख-कोटी रुपयांचे व्यवहार स्वत:च्या हिमतीवर हाताळते. ती सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटुन उठते. दुसऱ्या स्त्रीवरील अन्यास असहय असेल तर तिलाही सहकार्य करते व अन्यायाला वाचा फोडते. एकजूट करुन ‘हम भी कुछ कम नहीं’ हे सिद्ध करुन दाखविते. सांस्कृतिक क्षेत्र म्हणजे नाटक, सिनेमा या क्षेत्रातही तिने प्रगती साधली आहे. पडदापद्धतींचा पडदा फाडून तिने सर्व क्षेत्रात उडी घेतली आहे.

स्त्री म्हणजे कठपुतळी बाहूली नाही. तिलाही मन भावना आहेत. ती स्वत: विषयी विचार करु शकते. तिला दुखवणे म्हणजे पेटत्या विस्तवात हात घालणे होय. जखमी नागिणीच्या शेपटीवर पाय पडताच जसा ती डंख मारते तशी अन्याय झालेली स्त्री फुलन देवी बनते. पुढे मुख्यमंत्रीदेखील बनते पण ती अन्यास सहन करुन झुरत नाही, विझत नाही तर ती चेतावते व अखेरपर्यंत अन्यायाशी झंजत रहाते व स्वत:ला न्याय मिळवून घेते.

तिला सहानुभूती, दया नको आहे तर योग्य न्याय हवा आहे. स्वातंत्र्य हवे आहे. आजची महिला स्वत:च्या पायावर उभी असल्याने आलेल्या संकटाला न घाबरता, न डगमगता खंबीरपणाने सामना देते. व संकटावर विजय मिळवते त्यामुळे सती जाणे, केशवपन, विधवा विवाह बंदी अशांसारख्या पुरातन रुढींना तिला तोंड द्यावे लागते. पण त्यातुनही तावून सुलाखून निघते आणि यश प्राप्त करते.

पुढे वाचा:

Leave a Reply