पोस्टमन निबंध मराठी – Essay On Postman in Marathi

खाकी पोषाख, खांद्यावर लटकावलेली मोठी पिशवी, हातात व्यवस्थितपणे लावलेला, पत्रांचा गठ्ठा, खिशाला अडकवलेलं पेन असा या पोस्टमनचा पोषाख असतो. ठरलेल्या वेळी ते पोस्टातून आपापल्या विभागातील पत्रे घेऊन बाहेर पडतात. त्यांची वेळ कधी चुकणार नाहीच. .

प्रत्येक घरात, सोसायटीत कोणाचं कोणतं घर हे त्यांच्या नेमकं लक्षात रहातं. बिनचूकपणे ते त्या घरातील पत्रे देत असतात. किती कटकटीचे काम असते हे!पण हे सर्व काम ते अगदी यंत्रासारखे करीत असतात. एखाद्या पत्रात आनंदाची बातमी असते, एखादं पत्र काही दु:खद घटनेची बातमी देणारं असतं. पण पोस्टमन अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी देत पुढे पुढे जातच राहतात.

पोस्टमन निबंध मराठी-Essay On Postman in Marathi
पोस्टमन निबंध मराठी-Essay On Postman in Marathi

पोस्टमन निबंध मराठी – Postman Nibandh in Marathi

खाकी पोषाख, खांद्यावर लटकावलेली मोठी पिशवी, हातात व्यवस्थितपणे लावलेला, पत्रांचा गठ्ठा, खिशाला अडकवलेलं पेन असा या पोस्टमनचा पोषाख असतो. ठरलेल्या वेळी ते पोस्टातून आपापल्या विभागातील पत्रे घेऊन बाहेर पडतात. त्यांची वेळ कधी चुकणार नाहीच. . प्रत्येक घरात, सोसायटीत कोणाचं कोणतं घर हे त्यांच्या नेमकं लक्षात रहातं. बिनचूकपणे ते त्या घरातील पत्रे देत असतात.

किती कटकटीचे काम असते हे ! पण हे सर्व काम ते अगदी यंत्रासारखे करीत असतात. एखाद्या पत्रात आनंदाची बातमी असते, एखादं पत्र काही दु:खद घटनेची बातमी देणारं असतं. पण पोस्टमन अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी देत पुढे पुढे जातच राहतात.

पोस्टमन मनीऑर्डरही आणतात. सध्याच्या आधुनिक युगात फोन, फॅक्स व कम्प्यूटरसारखी साधने असतानाही पोस्टमनची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

पोस्टमन निबंध मराठी – Postman Nibandh in Marathi

पोस्टमनला सगळे ओळखतात, तो एक सरकारी कर्मचारी आहे आणि पोस्टात काम करतो. पत्र, पार्सल, मनिऑर्डरर्स आदी वाटप करीत असताना पहायला मिळू शकतो. एका पोस्टमनचं काम सोपं नसतं, त्याला पत्र वाटप करताना खूप परिश्रम घ्यावे लागतात, ऊन असो, थंडी असो अथवा पाऊस त्याला दररोज आपलं कर्तव्य पूर्ण करावं लागतं.

पोस्टमनचं आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्याच्या शिवाय आपल्या जीवनाची गाडी धकू शकत नाही. तो आपल्याला आपल्या पत्राद्वारे आपले नातेवाईक, मित्रमंडळी आदींसोबत जोडतो. गावातील पोस्टमनचे काम तर आणखीनच कठीण आसलेलं दिसेल. तो गावकऱ्यांचा चांगला मित्र पण असतो. निरक्षर आणि आडमुठ्या लोकांना तो त्यांचे पत्र वाचवून दाखवतो, कधी-कधी त्यांना पत्र पण लिहून देतो. तो त्यांना पोस्टकार्ड, लिफाफे, मनिऑर्डर फॉम आदी देखील विकतो. कधी-कधी त्यांना कुत्र्यांचा ससेमीरा टाळावा लागतो. तर कधी पूर आलेली नदी ओलांडून जावे लागते. –

पोस्टमनचे काम खरोखरच कठीण आहे. परंतु त्यांना त्याप्रमाणे पगार मात्र मिळत नाही. त्याला अतिशय कमी पगारात संसार चालवावा लागतो. सरकारने त्याची स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. राहाण्यासाठी त्याला चांगली घरे दिली पाहिजेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा देखील विचार व्हायला हवा.

पोस्टमन निबंध मराठी – Postman Nibandh in Marathi

पोस्टाची सेवा ही फार उपयुक्त सेवा आहे. ही सेवा आपल्या दाराशी घेऊन येणारा माणूस म्हणजेच पोस्टमन. दूधवाला, पेपरवाला जसे आपल्याला सेवा देतात तशीच सेवा पोस्टमनही आपल्याला देतो. घरोघरी जाऊन पत्रे, पार्सले, मनी ऑर्डरी आणि रजिस्टर्ड पत्रांचे तो वाटप करतो.

जुन्या काळी जेव्हा फोन, इंटरनेट, ईमेल अशी साधने उपलब्ध नव्हती तेव्हा दूर असलेल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्र हे एकच माध्यम होते. त्यामुळे घराघरातील लोक पोस्टमनची चातकासारखी वाट पाहात. कधीकधी तर गावच्या लोकांना वाचता येत नसल्यामुळे पोस्टमनला आलेली पत्रे वाचूनही दाखवावी लागत.

आताही काही खेड्यात ते करावे लागते. सध्या खाजगी कुरियरची सेवा लोकांना उपलब्ध असली तरी ती फक्त मोठ्या शहरांसाठीच असते. त्यामुळे लहान गावात पत्र पाठवायचे झाल्यास पोस्टाचीच सेवा घ्यावी लागते. शिवाय खाजगी सेवा खूप महागही असते. त्यामुळे लग्नपत्रिका, हॅण्डबिले, कंपन्यांचे अहवाल इत्यादी पाठवण्यासाठी पोस्टाची सेवा खूपच सोयीची पडते. मात्र त्यासाठी पीन कोड अगदी अचूक लिहिणे आवश्यक आहे. तसा तो लिहिला असेल तर पत्र वेळेत पोचते. ही पत्रे वेळेवर पोचवण्याचे काम पोस्टमनचतर मेहनत घेऊन करीत असतात.

पूर्वी पोस्टमनला घरोघरी जाऊन पत्रे टाकावी लागत. परंतु हल्ली शहरात उंच इमारतींमध्ये तळमजल्याला पोस्टाच्या पेट्या लावलेल्या असतात. पोस्टमनच्या दृष्टीने हे सोयीचे झाले आहे.

पोस्ट आणि डाक खाते ही सरकारच्या अखत्यारीत असलेली सार्वजनिक सेवा आहे. पोस्टमन हा त्या खात्यात नोकरी करणारा एक सेवक असतो म्हणजेच पर्यायाने तो जनतेचाचसेवक असतो.

पोस्टमनला प्रामाणिकपणे आपले काम करावे लागते. विशेषतः खेड्यापाड्यामध्ये मनीऑर्डर पोचवताना चोरांची आणि लुटारूंची भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांमध्ये अंतरही असते. तेव्हा पोस्टमनला खूपच पायपीट करावी लागते. अशा ठिकाणी काम करणा-या पोस्टमनला सरकार सायकल, रेनकोट अशा सोयी पुरवते. त्याशिवाय त्यांचा पगारही वाढवला पाहिजे. तसेच धोक्याच्या ठिकाणी त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे.

असा आहे पोस्टमन नावाचा जनसेवक.

पोस्टमन निबंध मराठी – Postman Essay in Marathi

ज्याप्रमाणे सफाई कामगार, दूधवाला, पेपरवाला, आपली कामे नियमितपणे करतात त्याचप्रमाणे पोस्टमनही समाजात जनसेवकाची महत्त्वाची भूमिका बजावतो. पोस्टमन घरोघर जाऊन पत्र, मानिऑर्डरी, रजिस्टर्ड पत्रांचे, पार्सलचे वाटप करतो.

पोस्टमन डाक व तारविभागातील एक सरकारी कर्मचारी आहे. त्याचे कार्य महत्त्वाचे व कठीण आहे. थंडी, ऊन, पावसातही त्याचे काम चालू असते. घरोघर जाऊन टपाल, तार, रजिस्ट्री वाटणे हे त्याचे दैनंदिन काम आहे. सरकारकडून त्याला मोफत गणवेश मिळतो.

रोज त्याला मुख्य टपाल कार्यालयातून ठराविक विभागाचे टपाल देण्यात येते. सायकलने जाऊन तो टपाल वाटप करतो. एक कर्तव्य तत्पर पोस्टमन प्रत्येक पत्र त्याच्या पत्त्यावर नेऊन देतो. पोस्टमन इमानदार असणे आवश्यक आहे. लहान गावे, खेडी जेथे अजूनही संपर्काची अन्य साधने नाहीत, अशा ठिकाणी पोस्टमनची वाट आतुरतेने पाहिली जाते. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी तर तो देवदूत असतो.

वाढदिवस, दीपावली, नूतन वर्ष आणि परीक्षेचे निकाल अशा सर्व प्रसंगी सगळे जण पोस्टमनची वाट पाहतात. अशा प्रसंगी अनेक शुभेच्छा पत्रे, भेटी पोस्टद्वारे लोक आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवितात. जेव्हा परीक्षेचे निकाल लागतात, तेव्हा विद्यार्थी-विद्यार्थिनी , त्यांचे मित्र-मैत्रिणी पालक, स्नेही पोस्टमनला घेरतात. अशा वेळी बरेच लोक खुश होऊन पोस्टमनला बक्षिसी देतात, मिठाई देतात.

शहरात काम करणाऱ्या पोस्टमनपेक्षा खेड्यात काम करणाऱ्या पोस्टमनचे काम अवघड असते. चोर-लुटारूंची त्याला भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांत अंतर जास्त असते. सरकारने अशा ठिकाणी काम करणाऱ्या पोस्टमनच्या संरक्षणाची सोय करणे आवश्यक आहे. महागाई खूप असल्यामुळे त्यांचा पगार वाढविला पाहिजे. त्यांना गरम कपडे व छत्री दिली पाहिजे. त्यामुळे त्यांची कार्यकुशलता वाढेल. अशा या जनतेच्या सेवकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

पोस्टमन निबंध मराठी – Essay On Postman in Marathi

आमच्या घरी पत्रे घेऊन येणा-या पोस्टमनकाकांचे नाव दाजीकाका भडांगे आहे. त्यांची आमच्याकडे दर दोन दिवसांनी चक्कर असतेच. आमच्याकडे माझे बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी- सा-यांची पत्रं येतच असतात. तरी आमचा पहिलाच मजला आहे म्हणून ठीक आहे. पण काही काही ठिकाणी मात्र त्यांना तीन तीन मजले चढावे लागतात. कारण लिफ्ट काही सगळीकडेच नसते.

पोस्टाची सेवा ही फार उपयुक्त सेवा आहे. ही सेवा आपल्या दाराशी घेऊन येणारा माणूस म्हणजेच पोस्टमन. दूधवाला, पेपरवाला जसे आपल्याला सेवा देतात तशीच सेवा पोस्टमनही आपल्याला देतो. घरोघरी जाऊन पत्रे, पार्सले, मनी ऑर्डरी आणि रजिस्टर्ड पत्रांचे तो वाटप करतो.

जुन्या काळी जेव्हा फोन, इंटरनेट, ईमेल अशी साधने नव्हती तेव्हा दूरच्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्र हे एकच माध्यम होते. त्यामुळे घराघरातील लोक पोस्टमनची चातकासारखी वाट पाहात. कधीकधी तर लोकांना वाचता येत नसल्यामुळे आलेली पत्रे पोस्टमनना वाचूनही दाखवावी लागत. आताही काही खेड्यात ते करावे लागते. सध्या खाजगी कुरियरची सेवा लोकांना उपलब्ध असली तरी ती फक्त मोठ्या शहरांसाठीच असते. त्यामुळे लहान गावात पत्र पाठवायचे झाल्यास पोस्टाचीच सेवा घ्यावी लागते. शिवाय खाजगी सेवा खूप महागही असते.

त्यामुळे लग्नपत्रिका, हॅण्डबिले, कंपन्यांचे अहवाल इत्यादी पाठवण्यासाठी पोस्टाची सेवा खूपच सोयीची पडते. मात्र त्यासाठी पीन कोड अगदी अचूक लिहिणे आवश्यक आहे. तसा तो लिहिला असेल तर पत्र वेळेत पोचते. ही पत्रे वेळेवर पोचवण्याचे काम पोस्टमनच तर मेहनत घेऊन करीत असतात.

पोस्ट आणि डाक खाते ही सरकारच्या अखत्यारीत असलेली सार्वजनिक सेवा आहे. पोस्टमन हा त्या खात्यात नोकरी करणारा एक सेवक असतो म्हणजेच पर्यायाने तो जनतेचाच सेवक असतो.

पोस्टमनला प्रामाणिकपणे आपले काम करावे लागते. विशेषतः खेड्या- पाड्यामध्ये मनीऑर्डर पोचवताना चोरांची आणि लुटारूंची भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांमध्ये अंतरही असते. तेव्हा पोस्टमनला खूपच पायपीट करावी लागते. अशा ठिकाणी काम करणा-या पोस्टमनला सरकार सायकल, रेनकोट अशा सोयी पुरवते. त्याशिवाय त्यांचा पगारही वाढवला पाहिजे. तसेच धोक्याच्या ठिकाणी त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे.

पोस्टमन मला खूप आवडतो. दर वर्षी माझी आई आमच्या पोस्टमनकाकांना दिवाळी देते, त्याशिवाय फराळाचे पदार्थही देते. त्या काम करणा-या माणसाची अशी आम्ही स्वखुषीने कदर करतो.

पोस्टमन आपला मित्र मराठी निबंध – Postman Apla Mitra Nibandh

मी शाळेतून परतत होतो. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. तेव्हा आमच्या घरी रोज दुपारी एकच्या सुमाराला येणारा पोस्टमन आमच्या वसाहतीतील पत्रे वाटून परतत होता. खांदयावरची त्याची टपालाची थैली बरीचशी रिकामी झाली होती. थकलेला असूनही, मला हसून ओळख दिली आणि पुढे गेला. पाहताच त्याने गेली कित्येक वर्षे हा पोस्टमन आमच्या वसाहतीत येत आहे. याने आमच्यासाठी कधी आनंदाच्या तर कधी दुःखाच्या पण महत्त्वाच्या वार्ता आणल्या.

एक सरकारी नोकर याच भावनेने आम्ही त्याच्याकडे अलिप्तपणे पाहतो. त्याचा खाकी पोशाख, त्याची खाकी पिशवी त्यासारखाच तोही एक खाकी माणूस ! त्याच्यातील खरा माणूस आम्हांला कधी जाणवलाच नाही. रविवारखेरीज दर दिवशी तो आमच्या वसाहतीत येत असतो, पण त्याला कपभर चहा दयावा असेही आम्हाला वाटले नाही. दिवाळीच्या फराळाला त्याला कधी बोलावले नाही.

खरे पाहता, पोस्टमन आमचा एक मित्रच आहे. तो आमच्या मित्रांची, आवडत्या माणसांची पत्रे आमच्यापर्यंत आणून पोचवतो. कुणाचे परीक्षेचे निकाल, नोकरीच्या नेमणुकीचे पत्र, शेअर्सवरील व्याजाचे धनादेश इत्यादी विविध पत्रे आणून देतो. पण आपण या पोस्टमनला कधी धन्यवाद देतो का? एकदा माझ्या वहिनींचा ‘माहेर’ मासिकाचा अंक वेळेवर आला नाही, तर त्यांनी किती तोंडसुख घेतले त्या पोस्टमनवर ! खरे तर त्यात त्याची काहीच चूक नव्हती. असे असले तरी हा पत्रवाहक आपली सेवा एखादया स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने नियमितपणे पार पाडतो.

पोस्टमन मनीऑर्डरही आणतात. सध्याच्या आधुनिक युगात फोन, फॅक्स व कम्प्यूटरसारखी साधने असतानाही पोस्टमनची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

पोस्टमन निबंध मराठी – Essay On Postman in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply