प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध – Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi

प्रत्येकाला वाटते की प्रयत्नांती पेक्षा प्रयत्नाधी परमेश्वर हवा आपण सुखात राहू शकू. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ या उक्तीप्रमाणे मनुष्य स्वभाव आहे. परंतु प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहेरे आधि केलेचि पाहिजे’ आधी प्रयत्न करुन कष्ट केल्याशिवाय देवपण येत नाही. ‘दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही प्रयत्न केले नाहीत तर अपयश हे ठरलेलेच.

प्रयत्नाने साधते असे कितीतरी ठिकाणी अनुभवास येते एवढीशी चिमुकली मुंगी ती सुद्धा प्रयत्नाने यशाला पोहोचते. मुंगी आपल्या तोंडात अन्नाचा कण घेऊन चढताना दहा वेळा पाय घसरुन पडते. पण न दमता ती प्रयत्न करत राहते व ध्येय गाठते. त्याचप्रमाणे कोळी लोक मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात व जाळे टाकत राहतात. प्रत्येक वेळी त्यांच्या जाळ्यात मासा अडकतोच असे नाही तरीही ते प्रयत्न करत राहतात आणि माशांनी भरलेली टोपली घेऊन बाजाराला जातात.

याविषयी पुराणात ही एका गुरु शिष्याचे उदाहरण आहे ब्रम्हदेवाचा मुलगा कच शुक्राचार्यांकडे संजीवना विद्या शिकण्यासाठी गेला असता तिथे त्याला अनेक प्रसंगांना तोंड दयावे लागले. अखेर त्यातही तो विजयी झाला आणि शुक्राचार्यांकडून विद्या प्राप्त करु शकला. म्हणूनच म्हटले आहे ‘प्रयत्नांती साधिती म्हणजेच प्रयत्न केला असता पत्थराचा देवही मदतीला येवु शकतो’. पण प्रयत्न न करता फक्त यशाची अपेक्षा करीत बसले असता निराशा पदरी पडते आणि ती व्यक्ती केव्हाही सुखी होवू शकत नाही. अभ्यासात पहिल्या वर्षी नापास झालेला मुलगा दुसऱ्यांदा जोनाने प्रयत्न करु लागला तर प्रथम क्रमांक पटकावु शकतो. पण प्रयत्न न करता फक्त निराशेचे अश्रु ढाळत राहिल्यास कधीच यश प्राप्त करु नाही. म्हणूनच संत रामदासांनी म्हटले आहे. ‘केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे’.

एवढा हुशार न्युटन पण मनात कधीही न्यूनगंड न बाळगता म्हणे की माझे ज्ञान या वाळवंटातील वाळूच्या कणाएवढे व समुद्रातील पाण्याच्या एका थेंबाएवढे आहे. म्हणूनच म्हटले आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’.

प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध | Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi

एक मुलगा शिक्षकांना भेटायला आला आणि म्हणाला, “सर, मला निबंध लिहायला जमत नाहीत. मी निबंधाचा प्रश्न सोडून देतो.” सर म्हणाले, “अरे प्रयत्न कर. एकदा चूक होईल, दोनदा काय दहा वेळा चूकां होतील, पण कधी ना कधी तरी तुझ्या प्रयत्नांना यश येईलच. प्रयत्न सोडू नकोस.”

” सरांनी जे सांगितलं ते खरंच होतं. आपल्या जीवनात महत्त्व आहे ते प्रयत्नांना, कष्टांना, प्रयत्न केल्यावर तुम्हाला यशरूपी परमेश्वर भेटणारच आहे. आपण मनात अनेकदा नकारात्मक विचार करतो. “मला हे जमणारच नाही, मला हे येणारच नाही. असे नकारात्मक विचार केल्याने आपल्या हातून ते काम होत नाही. सकारात्मक दृष्टीकोन तुमच्यातला आत्मविश्वास वाढवत असतो.

शास्त्रज्ञांचं उदाहरण आपल्याला घेता येऊ शकेल. अनेकदा त्यांच्या संशोधनकार्यात त्यांना अपयशही येतं, पण खचून न जाता त्या अपयशाची ते कारणमीमांसा करतात. प्रयत्न करत राहतात आणि कालांतराने त्यांना यश मिळतं.

अनेक माणसं ही दैववादी वृत्तीची असतात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा वृत्तीनं ते वागत असतात. नशीबावरच पूर्णपणे अवलंबून राहिलं ते तर माणसाची प्रगती कशी होणार ? समजा एखादा रूग्ण आहे आणि तो डॉक्टरकडे गेलाच नाही, तर त्याच्या रोगावर इलाज कसा केला जाईल ? हा प्रयत्नवाद आपल्याला निसर्गातही, पशुपक्षातही पहाता येतो. एखादा कोळी जाळं विणताना अनेकदा धडपडतो, पण तो त्याचे प्रयत्न सोडत नाही. चिमणा-चिमणी काड्या-काड्या जमवून घरटं बांधतात. तिथे प्रयत्नवादाचीच प्रचिती येते. .

एखादा विद्यार्थी खूप परिश्रम करतो, तेव्हाच त्याला यशाचं शिखर गाठता येतं. कृष्णा पाटीलचं उदाहरण हेच सिद्ध करतं. एव्हरेस्ट शिखर लहान वयात सर करणारी ती पहिली मराठी महिला ठरली. हे कशाच्या बळावर, प्रयत्नांच्याच बळावर ! केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असं म्हणतात. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे’ किंवा Rome was not built in one night’. या म्हणी, ही वचनं देखील प्रयत्नवादाचंच महत्त्व पटवून देतात.

कष्ट केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही, हे सांगताना संत तुकाराम म्हणतात,

असाध्य ते साध्य, करिता सायास, ! तुका म्हणे ।।

आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, की छोटं ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे. प्रज्वलित मनं हे सर्वात महत्त्वाचे आणि श्रेष्ठ संसाधन आहे. भारताला इ.स. २०२० सालापर्यंत आर्थिक महासत्ता बनवणं, हे त्यांचं स्वप्न आहे. ते देखील प्रयत्नाने पूर्ण होऊ शकेल.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे देखील प्रयत्नवादाचा पुरस्कार करणारे होते. शेतकरी कष्ट करून पिक पिकवतात, गुरू प्रयत्नांनी शिष्याच्या जीवनाला दिशा देतात, डॉक्टर प्रयत्नांनी रुग्णाचा जीव वाचवतात. तर पोलीस प्रयत्न करून गुन्हेगारांना पकडतात. विदयार्थी प्रयत्न करून यशस्वी होतात. ही सगळी तर प्रयत्नवादाचीच उदाहरणे आहेत, नाही का ?

आज माणसाच्या प्रयत्नांना यश आल्यामुळेच तर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करू शकलो. जग जवळ येऊ लागलं. आपल्यातील संवाद सोपा झाला. माणसाचं आयुष्य सुखकर झालं. या सगळ्याच्या मुळाशी आहे तो प्रयत्नवाद आणि प्रयत्नवादच !

प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध – Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply