प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
पृथ्वीवर अनेक समस्या आहेत. काही समस्या मानवनिर्मित आहेत, तर काही समस्या निसर्ग निर्मित आहेत. प्रदूषण ही मानवनिर्मित समस्या आहे. जिचे परिणाम मानवाला आणि पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.
प्रदूषण हे तीन प्रकारे होते. हवा प्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण. हे प्रदूषणाचे तीन प्रकार आहेत. कारखान्यांतील दूषित वायू, खाणकाम, विविध प्रकारच्या भट्ट्यांतून आणि कारखान्यातून निघणारा विषारी वायू आणि धूर, वाहनांचा धूर, कच्च्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांनी उडवलेली धूळ यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. प्रदूषित झालेल्या हवेमुळे माणसाला अनेक प्रकारचे श्वसनांचे आजार होतात. वनस्पतींवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतात.
आजकाल शुद्ध पाण्याच्या नद्या मिळणे कठीण झाले आहे. गावांतील आणि विशेषतः शहरांतील सोडलेल्या सांडपाण्यामुळे आणि कारखान्यातील विषारी पदार्थ, घाण, नद्यांमध्ये सोडल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. जल प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांबरोबर मानवाचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे.
ध्वनिप्रदूषण ही तिसरी मानवनिर्मित समस्या. वाहनांचा कर्णकर्कश आवाज, मोठ्याने लावलेले लाऊडस्पिकर, कारखान्यांचे भोंगे, वाहनांचे हॉर्न यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा येणे, मानसिक संतुलन बिघडणे इत्यादी विकार होतात. प्रदूषणाच्या या भस्मासुराला सर्वांनी मिळून गाडले तरच या पृथ्वीवर मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे.
पुढे वाचा:
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी
- बैल पोळा निबंध मराठी
- पोलीस निबंध मराठी
- पोरक्या मुलीचे मनोगत
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध
- पुस्तकाची कैफियत निबंध मराठी
- पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध
- पिंजऱ्यातील सिंहिणीचे मनोगत
- पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त
- पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी
- पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी
- पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन
- पाणी मराठी निबंध मराठी
- पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
- पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी
- पाखरांची शाळा निबंध मराठी