बाबा आमटे निबंध मराठी – Baba Amte Essay in Marathi
आपल्या कार्यानेच जगात चिरंजीव होणारे फार थोडे महान पुरुष असतात. बाबा आमटे त्यांपैकी एक आहेत. विदर्भातील वरोरा येथील एका सुखवस्तू घराण्यात १९१४ साली त्यांचा जन्म झाला होता. बाबा आमटे पेशाने वकील होते. त्यांना नगराचे उपाध्यक्ष होण्याचाही मान मिळाला होता. पण बाबांचे लक्ष वेधले एका महारोग्याने – त्याच्या दुःखाने, व्यथेने!
बाबा कलकत्ता येथे गेले. तेथे त्यांनी कुष्ठरोगाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर ते आपल्या पत्नीमुलांसह वरोऱ्याला परत आले. तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवन’ उभे केले. समाजाने दूर लोटलेल्या त्या मंडळींना त्यांनी उदयोगधंदे शिकवले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना स्वावलंबी बनवले.
नंतर बाबांनी तरुणांना मार्ग दाखवला. अंधांसाठी ‘मुक्तांगण’ निर्माण केले, वृद्धांसाठी ‘उत्तरायण’ सुरू केले. अशा रीतीने बाबा सदैव दुसऱ्यांसाठी जगले. जगाला बाबांच्या कार्याचे महत्त्व कळले. मदतीचा ओघ सगळीकडून सतत येत राहिला. स्वकीयांनी आणि परकीयांनी अनेक गौरवपदे बाबांना दिली.
९ फेब्रुवारी २००८ या दिवशी बाबा अनंतात विलीन झाले. पण बाबा आपल्या महान कामगिरीने अमर झाले.
पुढे वाचा:
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी
- मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी
- बरे सत्य बोला यथातथ्य चाला
- फॅशन आणि विद्यार्थी भाषण मराठी
- फुलाचे मनोगत निबंध मराठी
- फुलपाखरू निबंध मराठी
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी
- फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
- प्रामाणिकपणा मराठी निबंध
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध मराठी
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी