बाजारातील एक तास निबंध मराठी – Bajaratil Ek Taas Nibandh Marathi

प्रत्येक माणसाचा दिवस खरेदीशिवाय जातच नाही. पण दिवाळीचा सण म्हटला की बाजार म्हणजे आनंदजत्राच वाटते.

मीही यावर्षी आईबाबांबरोबर रामदास मंडईत गेले होते. वेळ सायंकाळी पाचची होती. रस्त्यावर वाहनांची ये-जा होती. कार्यालये सुटून लोक घरी जात होते. एवढ्यात आम्ही बाजारात पोचलो.

पाहतो तो काय ? बाजाराच्या सुरुवातीलाच एक पुतळा होता. नाव दिले होते ‘रामदास मंडई.’

एका रांगेत पत्र्याची १० ते १२ दुकाने फटाक्यांची होती. विविध नावाचे लेबल लावलेले फटाके तेथे होते. तर थोडे पुढे गेल्यावर भांड्यांची दोन दुकाने दिसली. त्याच्या विरुद्ध बाजूस भेटकार्डाची २ दुकाने होती. तेथे मुलांची गर्दी होती. पुढे लहान मुलांची खेळणी दिसली. तेथे एक रिक्षावाला व एक स्त्री यांची वादावादी चालली होती. आम्ही थोडी थोडी खरेदी करीत पुढे पुढे चाललो होतो.

बाजारात खूपच धूळ उडत होती. लोकांच्या गोंगाटापुढे डोके ठणकायला लागले होते. कधी सहा वाजले ते कळलेच नाही. आम्ही हातातील ओझी सांभाळत घरी पोचलो.

बाजारातील एक तास निबंध मराठी – Bajaratil Ek Taas Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply