भारतीय संस्कृती मराठी निबंध – Bhartiya Sanskriti Nibandh in Marathi
पूर्वी माणूस भटक्या स्थितीत रानोमाळ फिरत होता. मग त्याने शेतीची कला शोधून काढली आणि तो एका जागी स्थिर झाला. त्याला जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने त्याने मुख्यत्वेकरून नद्यांच्या काठावर आपली वस्ती केली. अशा त-हेने नद्यांच्या काठांवर वेगवेगळ्या मानवी संस्कृती प्राचीन काळापासून उदयाला आल्या आणि विलयही पावल्या. भारतीय संस्कृतीला पाच हजार वर्षांची परंपरा आहे असे आपण मानतो. आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे.
भारतीय संस्कृतीत असे काही आहे जे जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही. भारत जगातील एक पुरातन राष्ट्र आहे. त्याला भारतवर्ष, आर्यावर्त, हिंदुस्थान, हिंद, भारत आणि इंडिया अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आर्यांनी आणि द्रविडांनी ह्या संस्कृतीचा विकास केला.
प्राचीन काळी हूण, शक आदी रानटी टोळ्यांनी भारतावर हल्ले केले परंतु ते इथलेच झाले. त्यामुळेच आपल्याकडे हजारो प्रकारचे रीतीरिवाज, पोशाख, विवाहाच्या आणि खाण्यापिण्याच्या पद्धती निर्माण झाल्या आहेत. आपल्या देशात अनेक धर्म, जाती आणि संप्रदायाचे लोक राहातात. येथील अठराप्रादेशिक भाषांना राज्यघटनेने मान्यता दिलेली आहे. धर्म,जाती, भाषा, वेषभूषा ह्यात भिन्नता असूनही आपण सर्वजण सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी बांधले गेलो आहोत हेच आपले वैशिष्टय आहे. कारण माणसाचा धर्म बदलला तरी मूळ संस्कृतीशी जोडलेली नाळ कायम राहाते.
आपल्या देशाच्या संस्कृतीत कित्येक सणवार आहेत. त्यातील काही सण जरी प्रादेशिक असले तरी होळी, दिवाळी. दसरा, रक्षाबंधन, मकर संक्रांत असे सण देशाच्या ह्या कोप-यापासून त्या कोप-यापर्यंत सर्वत्र साजरे केले जातात.
आपली भारतीय संस्कृती ही सहिष्णु आहे. ‘ हे विश्वची माझे घर’ असे आपण मानतो. कुठल्याही संकुचितपणाला आणि कूपमंडूक वृत्तीला ह्या देशात थारा नाही. शांती, अहिंसा, सहिष्णुता, औदार्य, अपरिग्रह, दया आणि क्षमा ह्यांचे धडे आपल्या संस्कृतीने जगाला दिले आहेत. मात्र संकटसमयी कठोरपणे दुष्टांचे निर्दालन करण्यासही ती मागेपुढे पाहात नाही.
अशी ही आपली मूळ संस्कृती आपण कधीही विसरता कामा नये कारण शेवटी ती मानवता जपणारी संस्कृती आहे. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी हे आपल्या संस्कृतीचे ब्रीद आहे.
पुढे वाचा:
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी