प्राणिमात्रांचे अपत्यप्रेम निबंध मराठी

सर्वच प्राण्यांना आपली पिल्ले प्रिय असतात. हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेले साहस चिरंतन झालेले आहे. अंगणात दाणे टिपणारी कोंबडी आपल्या पिल्लांबाबत केवढी जागरूक असते! सर जरा खुट् आवाज झाला की,ती आपल्या पिल्लांना इशारा करून पंखांखाली घेत असते.

घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिल्लांपाशी

एवढी मोठी घार आपल्या बाळांसाठी भक्ष्य शोधत असते; पण त्याच वेळी आपल्या पिल्लांकडे तिचे पूर्ण लक्ष असते. पिल्लांसाठी पक्षी घरटे बांधतात. नंतर पिल्लांचे संगोपन करतात. पिल्लांना उडता येऊ लागेपर्यंत ते त्यांची काळजी घेतात.

मुंगीसारखा चिमुकला प्राणी आपल्या अपत्यांसाठी बेगमी करून ठेवतो. रानात चरायला गेलेली गाय संध्याकाळ झाली की, गोठ्याकडे धावत सुटते; कारण तिचे वासरू गोठ्यात असते. असे आहे हे अपत्यप्रेम! पोटाला पिल्लू चिकटलेली माकडीण वा कांगारूची मादी यांचेही अपत्यप्रेम लक्षात घेतले पाहिजे. मांजरी तिची पिल्ले लहान असताना सतरांदा जागा बदलते, ते त्यांच्या रक्षणासाठीच! ती पिल्लांना तोंडात धरते, पण तिचे दात त्यांना कधीही लागत नाहीत. असे आहे हे अपत्यप्रेम!

पुढे वाचा:

Leave a Reply